IND vs NED : आज भारत विरुद्ध नेदरलँड्स ! पावसाचं संकट कायम?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । T20 टी वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडियाचा आज (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सशी (Netherlands) सामना होणार आहे. सिडनमध्ये टीम इंडियाला जेवण्यावरुन जी वागणूक देण्यात आली त्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती. टीम इंडियासोबत झालेल्या भेदभावानंतर आज टीम इंडिया नेदरलँड्सचा पराभव करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) (SCG) खेळवला जाईल. पाकिस्तानला (Pakistan) पराभूत केल्यानंतर T20 World Cup मध्ये विजयाचा घोडदौड कायम राखण्यासाठी विराट टीम पूर्ण ताकदीने लढणार आहे.

पावसाचं संकट कायम? (Rain threat on India-Netherlands match)
पाकिस्तानशी मॅच असताना जसं पावसाचं संकट कायम होतं तसंच आजच्या मॅचवरही पावसाचे काळे ढग घोंगावतायत. हवामान विभागाने सिडनीमध्ये (Sydney Weather Forecast) 80% पावसाची शक्यता वर्तवली आहे.

टीम इंडियाची संभाव्य खेळी 11 (Team India’s probable playing 11)
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.

नेदरलँडसाठी संभाव्य खेळी 11 (Probable Playing 11 for Netherlands)
विक्रमजीत सिंग, मॅक्स ऑड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीकी, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन, फ्रेड क्लासेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *