महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – नाशिक- जिल्ह्यात करोना संसर्गाचा फैलाव वाढत असून मंगळवारी सकाळी आणखी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चार नवीन रुग्णांचा समावेश असून मालेगावातील एका बाधित रुग्णाचा दुसऱ्यांदा पाठविलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नव्या रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. सटाणा, येवला, सिन्नर, आणि नाशिक शहरातील हे रुग्ण असून सटाणा तालुक्यातही करोना विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३८२ झाली आहे.
करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस फैलावत आहे. रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला ८० संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्णासह त्यांचे नातेवाईक आणि प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. परंतु पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मालेगावातील दुसऱ्यांदा स्वॅबचे नमुने पाठविलेल्या एका ज्येष्ठ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे आहे.