*पिंपरी मोरवाडी :-*पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभाग अतंर्गत विविध अनुदान योजनेतील अर्जाच्या तारखेत वाढ देण्यात यावी अशी मागणी मल्हार आर्मी पि.चि.शहर अध्यक्ष दिपक भोजने यांनी मा. आयुक्त साहेब यांना निवेदन पत्र देऊन करण्यात आली त्यांनी निवेदनात महानगरपालिकेने समाज कल्याण विभाग विविध मागासवर्गीय व इतर अनुदान कल्याणकारी योजनाचेची तारीख १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर पर्यंत ठेवण्यात आली परंतु यावेळेस अर्ज ऑनलाईन पध्दतीने पालिकेच्या वेबसाईट वर कागद पत्र डाऊनलोड करून सादर करायचा होता त्यात बर्याच अडचणी निर्माण होत होत्या कधी साईट ओपन होत नव्हती तर कधी कागदपत्र डाऊनलोड होत नव्हती त्यामुळे या योजनां पासुन अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी वंचित राहू शकतात तसेच ही सेवा ई सेवा केंद्रावर सुरू करण्यात यावी व दहावी व बारावीची शिष्यवृत्ती योजना सर्व बोर्डास लागू करावी असे निवेदन पत्रा द्वारे करण्यात आली*