![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ | राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेली ‘महाराष्ट्र बनावटीचे मद्य’ (MML) ही नवी श्रेणी आता कायदेशीर अडचणीत सापडली आहे. मोठ्या मद्य उत्पादक कंपन्यांनी या नव्या श्रेणीविरोधात थेट हायकोर्टात याचिका दाखल केली असून ही श्रेणी रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जय पवार यांच्या कंपनीला पहिला परवाना
या प्रकरणात राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वाढली आहे.
कारण—
उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या Capovizat या कंपनीला
MML श्रेणीचा पहिलाच परवाना दिला गेला आहे.
यामुळे हा निर्णय हितसंघर्षाचा मुद्दा ठरेल का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. परिणामी हे प्रकरण अजित पवार यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीत आणणारे ठरू शकते, अशी चिन्हे आहेत.
नव्या श्रेणीमुळे कोण बळी पडले?
राज्यातील स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि बंद पडलेल्या लहान कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून जून ते ऑगस्टदरम्यान सरकारने MML श्रेणी लागू केली.
पण त्याच वेळी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला—
हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क निर्मिती खर्चाच्या तीन पटीवरून थेट साडेचार पट करण्यात आले.
या बदलाचा मोठा आर्थिक फटका खालील मोठ्या ब्रँडना बसला—
मॅकडॉवेल
रॉयल स्टॅग
इम्पिरियल ब्लू
ब्लेंडर्स प्राईड
आणि इतर बहुराष्ट्रीय उत्पादक. यामुळेच या कंपन्यांनी सरकारी धोरणाला पक्षपाती व लहान उद्योगांना अनावश्यक लाभ देणारे ठरवत कोर्टाची दारं ठोठावली आहेत.
