महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा (Ravi Rana) यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची जाहीर माफी मागितली आहे.
बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही शब्द गेले. त्यामुळे बच्चू कडू नाराज झाले. त्याचसोबत काही मंत्री, आमदारही नाराज झाले. माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझी मागतो, असं रवी राणा म्हणालेत.