LPG Price: महागाईपासून काहीसा दिलासा ! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ नोव्हेंबर । इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दिल्लीत इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपये ५ पैशांची कपात करण्यात आली आहे. तर कोलकात्यात ११३, मुंबईत ११५ रुपये ५ पैसे आणि चेन्नईमध्ये ११६ रुपये ५ पैशांनी हे दर कमी करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. दरम्यान घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवे दर लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी १७४४, कोलकात्यात १८४६, मुंबईत १६९६ आणि चेन्नईत १८९३ रुपये मोजावे लागणार आहेत.

एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एपलीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात होत असताना घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणतेही बदल होताना दिसत नाहीत. ६ जुलैपासून घऱगुती सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *