महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ नोव्हेंबर । विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय ही तिच्या हटक्या स्टाईलसाठी नेहमीच ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. परखड स्वभावासाठी आणि सडेतोड बोलण्यासाठी देखील ऐश्वर्याकडे पाहिले जाते. आज तिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
गेल्या दीड दशकांहून अधिक काळ ऐश्वर्या ही बॉलीवूडमध्ये चमकताना दिसते आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही कमालीचा आहे. काही दिवसांपूर्वी मणिरत्नम दिग्दर्शित पीएस 1 या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात ऐश्वर्या लीड रोलमध्ये होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली होती. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे.
ऐश्वर्यानं अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. संजय दत्त सोबत शब्दमध्ये, ऋतिक रोशनसोबत धुम 2 मध्ये तर दिल है मुश्किलमध्ये देखील बोल्ड अंदाजात ती दिसली होती. त्यानंतर मात्र तिचे इंटिमेट सीन कमी झाले. एका पत्रकारानं तिला त्यावरुन विचारणा केली होती. तुमच्या चित्रपटात तुम्ही इंटिमेट सीन फारसे देत नाही यामागील कारण काय, असा प्रश्न त्या पत्रकारानं ऐश्वर्याला विचारला होता. तो प्रश्न ऐकून ती चांगलीच संतापली होती.
ऐश्वर्यानं त्या पत्रकाराला चांगलेच झापले होते. तुम्ही पत्रकार आहात हे विसरु नका. गायनेलॉजिस्ट नाही. आम्ही काय करायचे काय नाही हे तुम्ही विचारु नका. मला इंटिमेट सीन करावेसे वाटत नाही याचे काही खास कारण नाही. त्यामुळे तो प्रश्न विचारुन उगाचच वाद निर्माण करु नका. असे तिनं सांगितले. मात्र त्या पत्रकारानं पुन्हा त्याच प्रश्नावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. मग ऐश्वर्याचा संयम सुटला तिनं त्याला चांगलेच सुनावले.