Weather Forecast : पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद ; लवकरच राज्यात गारठा वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ नोव्हेंबर । राज्यात पावसानं परतीची वाट धरताच आता थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ठाण्यात, नवी मुंबईत तर घाटमाथ्यावर हलकीशी थंडी जाणवायला लागली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या थंडी वाढल्याचे चित्र आहे. सर्वात कमी किमान तापमानाशी नोंद पुण्यात करण्यात आली आहे. पुण्यात १२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

सरासरीच्या तुलनेमध्ये तापमानात घट झाल्याने थंडी वाढली असून हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि हिमालयीन पर्वतरांगांवर होत असलेल्या बर्फदृष्टीमुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात शहर आणि लगतच्या भागात अशीच थंडी राहील. पुढील काही दिवस रात्रीचे तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. दरम्यान, दिवशा सुर्यामुळे उन्हाचे चटके बसतील आणि यामुळेच रात्री आणि सकाळी थंडावा जाणवतो.

हिवाळा जसजसा पुढे येत आहे, तसतसे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे हवामान कायम राहणार आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होते. औरंगाबाद (१३ अंश), नाशिक (१३.३ अंश), महाबळेश्वर (१३.८ अंश), सातारा (१४.३ अंश) आणि नागपूर (१४.८ अंश) ही महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणे आहेत जिथे तापमान सामान्यपेक्षा कमी राहिले.

तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि रायलसीमाच्या उर्वरित भागांवर ईशान्य मान्सून प्रगतीशील राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या आठवडाभरात या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *