महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीचौकात शिवशाही बसने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. यवतमाळ ते चिंचवड या मार्गावर धावणाऱ्या एस. टी. विभागाच्या शिवशाही बसने पेट घेतला असून या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
दरम्यान, गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 42 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याची माहिती आहे. तर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
मागच्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका खासगी बसला आग लागून जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी वणी येथे एसटी महामंडळाच्या एका बसला आग लागली होती. सुदैवाने त्या घटनेत जिवितहानी झाली नाही. तर पुण्यातील या घटनेत चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप आहेत.