महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीने सोमवारी न्यूझीलंड आणि बांग्लादेश सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड सीरीजसाठी दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना आराम देण्यात आला आहे. टी 20 टीमचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं आहे. हार्दिक पंड्याला का कॅप्टन बनवलय? ते जाणून घेऊ या.
हार्दिक पंड्याने मागच्या काही महिन्यात लीडर म्हणून स्वत:चा ठसा उमटवला आहे. त्याच्यामध्ये उत्तम नेतृत्वगुण दिसले आहेत. अनेक अवघड सामन्यांमध्ये त्याने परिपक्वता दाखवली आहे. टीमच्या गरजेनुसार खेळण्याला प्राधान्य दिलं आहे.
आयपीएलमध्ये त्याने गुजरात टायटन्सच नेतृत्व केलं. त्याच्या कॅप्टनशिपखाली पहिल्याच मोसमात टीमने जेतेपद मिळवलं. टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली. टीमला तो पुढे घेऊन जाताना दिसलाय.
पंड्याने मागच्या काही सीरीजमध्ये आपल्या कामगिरीतून उपयुक्तता सिद्ध केलीय. तो बॅट आणि बॉलने कमाल करतोय. आपल्या प्रदर्शनाने प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला कॅप्टन बनवलं जातं. पंड्यामध्ये हे गुण आहेत.
दुसऱ्याबाजूला हार्दिक पंड्या सरस कामगिरी करतोय. आयपीएलपासून हार्दिक पंड्या फॉर्ममध्ये आला आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या वेगवेगळ्या सीरीजमध्ये त्याने आपल्याबाजूने योगदान दिलं आहे. आज तो टीम इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. ऑलराऊडंर परफॉर्मन्समुळे लवकरच तो टीम इंडियाचा कॅप्टन बनेल अशी चर्चा आहे.