T20 WC : पाकिस्तान आव्हान कायम राखणार? आफ्रिकेला उपांत्य फेरीची आस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ नोव्हेंबर । पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज (ता. ३) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-२० विश्‍वकरंडकातील गट दोनमधील अत्यंत महत्त्वाची लढत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या लढतीत बाजी मारल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का होईल. पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांचे आव्हान कायम राहील.

दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेमध्ये अद्याप एकही लढत गमावलेली नाही. त्यामुळे या संघात आजच्या लढतीसाठी मोठे बदल करण्यात येतील, अशी चिन्हे नाहीत. रिझा हेंड्रीक्सला बाहेरच बसावे लागणार आहे. तबरेझ शम्सी या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान देण्यात येऊ शकते, पण त्यासाठी एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसवावे लागणार आहे. कागिसो रबाडा, वेन पार्नेल व ॲनरीक नॉर्कीया यांच्यापैकी कुणाला संघाबाहेर काढण्यात येईल असे वाटत नाही. त्यामुळे लुंगी एनगिडीला बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे.

या खेळपट्टीत दडलंय काय?

श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यामधील लढत ज्या ठिकाणी झाली त्याच स्टेडियममध्ये पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका लढत रंगणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत असून धावांचा पाऊसही पडेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पाकिस्तानसाठी अखेरच्या दोन लढतींमध्ये विजय मिळवणे महत्त्वाचे असणार आहे. अर्थात इतर संघांच्या निकालावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

आजची टी-२० लढत

पाकिस्तान – दक्षिण आफ्रिका – सिडनी, दुपारी १.३० वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *