महाराष्ट्र २४ – ऑनलाईन । पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी। लक्ष्मण रोकडे – मोठ मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी रिटेल क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर बरेच से किरकोळ व्यापारी अडचणीत आले होते, तर काहींना आपली दुकाने बंद करावे लागलेत. कारण त्यांचे सर्व गिर्हायीक…मोठ मोठे मॉल,सुपर मार्केट मध्ये जायला लागले होते. कारण की मॉल मध्ये प्रतेक वस्तूंची व्हरायटी भरपुर असते.शिवाय पाहिजे ती वस्तू तिथे उपलब्ध असते. सुरुवातीला मॉल मध्ये काही वस्तू मार्केट रेट पेक्षा कमी रेट मधे ही मिळत असत. शिवाय बाजारा मुळे फिरणेही होते.
आता गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना मुळे मॉल पुर्णपणे बंद आहेत. आणी कोरोनच्या धाकांने मॉलवर सध्यातरी खरेदीसाठी जाने लोक पसंत करणार नाहीत. हिच संधी साधून अशा परिस्थितीत सुशीक्षीत बेरोजगाराणे नोकरी मागे धावण्या पेक्षा आपापल्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा किरकोळ व्यापार/ दुकान किंवा छोट्याश्या दुकानांपेक्षा थोडेसे मोठ्या स्वरुपात म्हणजे मध्यम स्वरुपात व्यापार सुरु करावा. कारण की असा व्यापार नोकरी करण्यापेक्षा परवड तो.मात्र त्यासाठी मेहनत / कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. शिवाय व्यापारा चे पैसे व्यापारातच ओतावे लागतील. तेव्हा कळेल की नफा कीती होतोय. लोकल गिर्हाईकाला उत्तम प्रकारची सेवा दिली तर व्यापारात जम बसू शकतो .
……..मात्र त्यासाठी काळाची गरज ओळखून किरकोळ व्यापाराला काही बदल स्विकारावे लागतील…..ते मुद्दे: —-.# दुकानतील फर्नीचर त्या वस्तूंच्या आकाराचे कप्पे करुन पारदर्शक काचेतून लोकांना दिशेल असे असल पाहीजे…# वस्तूंची खरेदी घावुक व्यापारा कडून किंवा डायरेक्ट शेतकरी व उत्पादका कडुन खरेदी केल्या पाहीजेत. त्या साठी चार पाच दुकानदार एकत्र येवून मालाची खरेदी केली पाहीजे.# नेहमी येनारया गिर्हयिकाची वस्तूंची आवड निवड ओळखली पाहीजे व त्या नुसार त्याला तो उपलब्ध केला पाहिजे # दुकानात वस्तूंची मांडणी व्यवस्थीत असली पाहीजे अस्थाव्यस्थ नको. # वस्तू चकचकीत ब्रँड नेम सहीत दिसतील अशी लायटिंग केली पाहिजे. # दुकाना समोर टापटीप पणा पाहिजे. गिर्हाईकाला उभे रहायला जागा पाहीजे. दुकानाच्या पायरी स्वच्छ पाहीजेत. # एकाच वेळी चार पाच लोकल वस्तूं बरोबर ब्रँडेड वस्तू पण उपलब्ध करुन देणे…
सर्व प्रकारच्या गिर्हाईकांशी सु संवाद साधून जुळवून घेणे. #.घरपोहच वस्तूंचा पुरवठा करणे.#. एखादी वस्तू गिर्हाईकाला आवडली नाही तर ती परत घेणे त्या ऐवजी दुसरा ब्रँड देणे..दुकानात उपलब्ध नसेल तर लगेच श्यक्य तितक्या लवकर आणून देणे..#. ग्राहकाला बिलिंग साठी वेळ लागू नये म्हणून बिलिंग मशीन ठेवणे. शिवाय रोख ऐवजी कार्ड ने पेमेंट स्विकारण्या साठी कार्ड स्व्यप मशीन पाहीजे.
जो माल खपला नाही तो मुळ सप्लायर ला परत करने समजा सप्लायर परत घेणार नसेल तर तो माल सुट देवून ग्राहकाला पटवून विकला पाहीजे………. हे सर्व करीत असतां ना व्यापारात व्यावहारिक पणा व नम्रपणा पाहीजे. ग्राहक कुठे नाराज होणार नाही. याची काळजी घेने आवश्यक आहे. शिवाय व्यापारा चे पैसे व्यापारातच लावले पाहीजेत. बरेचसे लोक धंद्या चे पैसे दुसरीकडे वळवतात व धंद्यात नुकसान जाले अस म्हणतात., तस होता कामा नये..# मालाची खरेदी श्यक्य तोवर रोखीने करावी. ऊधारी ने खरेदी केली तर ती वेळेवर परत फेड केली पाहीजे…
सर्वात महत्वाचा मुद्दा सदर व्यापारा साठी लागणारे भांडवल कुठून उभे करावे ?….. सदर भांडवल शक्यतोवर बिनव्याजी उभारता आले तर खुपच उत्तम नाहीतर बँके कडून सरकारी योजनेंच्या अंतर्गत कर्ज मिळतात तिथून कर्ज घ्यावे किंवा प्रॉपर्टी गहाण ठेवून बँकेतून कर्ज मिळते. परंतू सदर कर्ज हप्ते वेळे वर परत फेड करावेत…. सदर कर्ज फेड नियमीत पणे केली तर बँका पुन्हा कर्ज देतात. अशा प्रकारे व्यवसायची वाढ होत जाते… संपुर्ण देशात अशा प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचे किरकोळ व्यापार धंदे सुरू केले तर सुशीक्षित बेरोजगारां ना उतपन्नचे साधन जागेवर मिळेल त्यामूळे देशातील आर्थिक मंदी ही कमी होईल…… श्री. पी.के. महाजन…जेष्ठ कर सल्लागार.