महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.देवेंद्र फडणवीस यांनी 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली आहे. यावेळी त्यांना प्रथमच कर्तिकीचा मान मिळाला.
मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब,कॉनवर अशा विविध देशी विदेशी 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले आणि वारकऱ्यांबरोबर ग्यानबा-तुकारामचा तालही धरला. साळुंखे दाम्पत्याने विठूरायाची महापूजा करण्याची संधी मिळूनही स्वतःसाठी काही न मागता राज्यातील सर्व शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी विठू-रखूमाईला साकडं घातलं.