ST Bus News: मुख्यमंत्र्यांनी बोलावली एसटी कामगारांची बैठक ; महागाई भत्ता, नव्या बसेस यांबाबत निर्णयाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांची (ST Bus) बैठक बोलावली आहे. या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्नि आणि काही अधिकारी उपस्थित राहणार आहेत. एसटी कामगारांसोबतची ही महत्त्वाची बैठक आज दुपारी अडीच वाजता मंत्रालयात होणार आहे. (MSRTC Bus News)

तसेच एसटी कामगारांना 34 टक्के महागाई भत्ता देण्याची शक्यता या बैठकीमध्ये वर्तवली जात आहे. तसेच एसटीच्या सेवेत लवकरच 900 वातानुकूलित मिडी बस येण्याची शक्यता आजच्या आहे, याबाबत या बैठकीत प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. (Eknath Shinde Latest News)

यावेळी नवीन सीएनजी वाहनांऐवजी 2000 डिझेल गाड्या आणि 2000 इलेक्ट्रिकल बसेस हेदेखील एसटी मंडळाच्या ताफ्यात येण्याची शक्यता या आहे. या विषयांवर सदर बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *