Santosh Bangar: संतोष बांगर पुन्हा अडचणीत ; पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । नेहमी कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आमदार बांगर यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आमदार बांगर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 27 ऑक्टोबर रोजी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असतांना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या आमदार बांगर यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. तर अशा पद्धतीने आता तू मला शिकवणार का? असे म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्याने या घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.

मी शिवीगाळ केलीच नाही…

याबाबत ‘एबीपी माझा’शी बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, मी कोणतेही शिवीगाळ केली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नसल्याच आमदार बांगर म्हणाले आहेत. मात्र आपण गार्डन गेटने गेलोहोतो हे आमदार बांगर यांनी मान्य केलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *