नांदेड हिंगोलीत आणखी १४ जवानांना कोरोना ! – बाधीतांची संख्या ८९ वर – २४ तासात ३६ जवान पॉझिटिव्ह – एकूण ८३ जवानांना कोरोनाची लागण

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी- संजीवकुमार गायकवाड – नांदेड : हिंगोलीमधील राज्य राखीव दलातील कोरोनाचा संसर्ग होत असलेल्या जवानांची संख्या वाढत असून मंगळवार दि. 5 मे रोजी 14 जवाना कोरोनाबधित झाले आहेत. तर सोमवारच्या रात्री 22 जवाना कोरोना पॉझिटीव्ह निघाले, असून मागच्या बारा ते चौदा तासांमध्ये 37 जण कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. यामध्ये 36 जवान व एका परिचारिकेचा समावेश आहे. आतापर्यंत आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात ८९ पैकी ८३ जण हे राज्य राखीव दलाचे जवान आहेत.

हिंगोली जिल्ह्यात दि. 4 रोजी रात्री उशिराला आलेल्या अहवालानुसार एसआरपीएफ च्या 22 तर एक परिचारिकेस कोरोनाची लागण झाली. तर मंगळवारी 14 जवानांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हयातील रुग्णांची संख्या 90 वर पोहचली आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मुंंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती. यातील 83 जवांनापैकी 35 जवान हे मालेगाव (नाशिक) तर मुंबई येथे 48 जवान कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 90 वर पोहचली आहे. यातील एक जणाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यास घरी पाठविण्यात आले आहे. दि. ५: हिंगोलीमधील राज्य राखीव दलातील कोरोनाचा संसर्ग होत असलेल्या जवानांची संख्या वाढत असून मंगळवार दि. 5 मे रोजी 14 जवाना कोरोनाबधित झाले आहेत. तर सोमवारच्या रात्री 22 जवाना कोरोना पॉझिटीव्ह निघाले, असून मागच्या बारा ते चौदा तासांमध्ये 37 जण कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. यामध्ये 36 जवान व एका परिचारिकेचा समावेश आहे. आतापर्यंत आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात ८९ पैकी ८३ जण हे राज्य राखीव दलाचे जवान आहेत.

हिंगोली जिल्ह्यात दि. 4 रोजी रात्री उशिराला आलेल्या अहवालानुसार एसआरपीएफ च्या 22 तर एक परिचारिकेस कोरोनाची लागण झाली. तर मंगळवारी 14 जवानांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हयातील रुग्णांची संख्या 90 वर पोहचली आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मुंंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती. यातील 83 जवांनापैकी 35 जवान हे मालेगाव (नाशिक) तर मुंबई येथे 48 जवान कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 90 वर पोहचली आहे. यातील एक जणाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यास घरी पाठविण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *