महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ नोव्हेंबर । राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी याबाबत माहिती दिली. (Chance of mid term elections in Maharashtra Prediction of Uddhav Thackeray)
कायंदे म्हणाल्या, आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतले जे पदाधिकारी असतात त्यांना जे पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. त्यानुसार आजची बैठक झाली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी काही खास पॅकेज जाहीर केले आहेत. यामुळं महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. कायमचं महाराष्ट्र-गुजरात असा वाद निर्माण करुन भाजपकडून मतांचं राजकारण केलं जात आहे, असा आरोपही यावेळी कायंदे यांनी केले आहेत.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. पण आता जनतेत काम करणारी मंडळी आता कोणीच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळं शिवेसना आता द्विधा मनस्थितीत आहे, त्यामुळं आपले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वातावरण निर्मिती करायचं काम सध्या उद्धव ठाकरे गटाकडून केली जात आहे.