T20 WC : आफ्रिकन खेळाडूने दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । टी-20 विश्वचषक 2022 मधील ग्रुप स्टेजचा रविवारी शेवटचा दिवस होता. या दिवशी गट-2चे तीन सामने खेळल्या गेले. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात झाला. या सामन्यात स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट पाहिला मिळाला. नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला आणि टी-20 विश्वचषकातून बाद काढले. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने चार विकेट गमावत 158 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ आठ विकेट गमावून केवळ 145 धावा करू शकला.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 16व्या षटकात डेव्हिड मिलर बाद झाला आणि इथून सामना फिरला. नेदरलँड्सच्या व्हॅन डर मर्वेने अप्रतिम झेल घेत मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मर्वेच्या या झेलने 1983 च्या विश्वचषकातील कपिल देवच्या झेलची आठवण करून दिली. कपिल देवने वेस्ट इंडिजविरुद्ध धाव घेत शानदार झेल घेतला. त्याच पद्धतीने मर्वेनेही मागे धावत सर्वोत्तम झेल टिपला आणि मिलरला बाद केले.

धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 15 षटकांत 4 गडी गमावून 111 धावा केल्या. क्लासेन 16 आणि मिलर 17 धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी पाच षटकांत 48 धावांची गरज होती. या जोडीने 15व्या षटकात 12 धावा केल्या. अशा स्थितीत हे दोघेही दक्षिण आफ्रिकेला सहज विजय मिळवून देतील असे वाटत होते, मात्र 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिलरने पुल शॉट खेळला. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत होता आणि मिलरला किमान दोन धावा मिळण्याची शक्यता होती, परंतु व्हॅन डेर मर्वेने माघारी फिरून एक अप्रतिम झेल घेतला आणि मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इथेच सामन्याला कलाटणी मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेला सामना गमवावा लागला.

व्हॅन डर मर्वे हा यापूर्वी आफ्रिकेकडून खेळला होता. त्याने आपल्या शानदार झेलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर फेकले. आफ्रिकन खेळाडूने दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ग्रँट इलियटने 2015 च्या विश्वचषकात आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर फेकले होते. इलियट न्यूझीलंडकडून खेळत होता. याआधी तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *