महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. पण काही दिवसात सिनेमाला कडाडून विरोध होतोय. तर आता दुसरीकडे हर हर महादेव हा सिनेमा देखील वादाच्या भोवऱ्यात आला आहे. पिंपरी येथील मंगला टॅाकिजमधील आजचे नियोजित चार शो रद्द करण्यात आले आहेत. हर हर महादेवचे शो रद्द करा. पोस्टर काढून टाका अन्यथा परिणामांना सामोरे जा, असं निवेदन संभाजी ब्रिगेडकडून मंगला चित्रपटगृहाच्या संचालकांना करण्यात आलं होतं. इतिहासाची मोडतोड करणारा. खोटा इतिहास दाखवणारा ‘हर हर महादेव’ सिनेमा तात्काळ बंद करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं बंद पाडले, असाही इशारा देण्यात आला होता.
हर हर महादेव या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे.शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे.इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे.मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी.बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे, असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे ‘कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदलं देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहे. वारंवार मराठी मराठी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे. पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे. राष्ट्रमाता बाजीप्रभूचां सल्ला घेताना दाखवले आहे. छत्रपती होतील ना राजे ?? अफजलखान क्रूर आहे हे बाजीप्रभू सल्ला देताना दाखवले आहे . म्हणजे छत्रपती यांच्या प्रगल्भ विचारांची चेष्टा केली आहे. छत्रपती यांना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतीवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला,असं खोट दाखवलं आहे’.