महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ नोव्हेंबर । नांदेडमधील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील गुरुद्वारापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बिलोली तालुक्यातील शंकरनगरकडे पदयात्रा रवाना झाली आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहुल गांधी नांदेडमध्ये पदयात्रा करणार आहेत. पुढील 14 ते 15 दिवस ते महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा करणार आहेत.
आमच्या यात्रेचे लक्ष्य
राहुल गांधी यांनी देगलूर वन्नाळी येथील बाबा जोरावर सिंग बाबा फतेह सिंगजी यांच्या गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी गुरुपूरनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांध म्हणाले, गुरुनानक देवजी यांच्या आशीर्वादाने परस्पर सौहार्द आणि समानता निर्माण करणे हेच आमच्या यात्रेचे लक्ष्य आहे.
आजच्या पदयात्रेत काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, कन्हैया कुमारसह सर्व प्रमुख काँग्रेस नेते सहभागी झाले आहेत. यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून ढोल-ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले आहेत.