Chandra Grahan 2022 : तुळशी विवाहचा आज शेवटचा दिवस, चंद्रग्रहणात लग्न करणं शुभ की अशुभ, जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ नोव्हेंबर । या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra ghrahan 2022) आज मंगळवार 8 नोव्हेंबर 2022 रोजी भारतासह अनेक भागांमध्ये दिसणार आहे. ग्रहण काळात अनेक गोष्टी या शुभ आणि अशुभ असतात. त्याशिवाय ग्रहण काळात अनेक गोष्टी करु नयेत असं सांगितलं जातं. अशात आज तुळशी विवाह (Tulsi Vivah 2022) करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांनी अजून तुळशी विवाह केला नाही. त्या लोकांना प्रश्न पडला आहे की, आज ग्रहणाच्या दिवशी तुळशीचा विवाह करता येतो का? यासंदर्भात शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊयात.

चंद्रग्रहणात लग्न करणं शुभ की अशुभ
ऑक्टोबरमध्ये दिवाळीत सूर्यग्रहणानंतर अगदी 15 दिवसांनी आज वर्षातील दुसरं आणि शेवटचं ग्रहण आहे. आज चंद्रावर पृथ्वीची सावली पडणार आहे, आज चंद्रग्रहण असल्याने तुळशी विवाह करणे शुभ आहे की अशुभ याबद्दल शास्त्र काय सांगतं…भारतात (india) हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे संध्याकाळी 6.20 म्हणजे ग्रहणमोक्ष झाल्यनानंतर स्नान करुन आपण तुळशीचं लग्न लावू शकतो.

तुळशी विवाहासाठी अशी तयारी करा!
तुळशी विवाहाच्यावेळी (Tulsi Vivah) पूजेमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. फळे, फुले, उदबत्ती, दिवे, भोग, हळद, कुमकुम, तीळ, हळदीची गाठ, बताशा, दिवा, तुळस, विष्णूजींचे चित्र, शाळीग्राम, गणेशजींची मूर्ती, कोणताही सुंदर रुमाल, श्रृंगाराच्या वस्तू, कापूर, तूप, लापशी. मंडप तयार करण्यासाठी ऊस, हरभरा भाजी, पाणपोई, हवन साहित्य, लाल चुनरी, वधू-वरांना द्यावयाच्या आवश्यक वस्तू इ. आताच बाजारातून घेऊन या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *