सर्वसामान्यांसाठी अंतिम श्वासापर्यंत लढणार, त्यांचे प्रेम हीच माझी खरी ताकद ; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचा निर्धार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ नोव्हेंबर । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. सकाळी सहा वाजताच गुलाबी थंडीत नांदेडमधील बिलोली येथून राहुल गांधींच्या पदयात्रेला सुरुवात झाली.

सकाळचा हाच डोस

सकाळी बिलोली येथील शंकरनगरमधून यात्रेस सुरुवात होताच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्या भेटीगाठी राहुल गांधींनी घेतल्या व त्यांच्या अडचणी समजन घेतल्या. अनेकांचे हातात हात घेऊन राहुल गांधींनी त्यांची विचारपूस केली व काही काळ प्रत्येकासोबत पदयात्रा केली. काही कोळी बांधवही आज यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधींनी त्यांचीदेखील भेट घेत विचारपूस केली. राहुल गांधी यांच्या सकाळचा हाच फ्रेश डोस असल्याचे ट्विट नंतर काँग्रेसने केले.

तुमच्यासाठी अंतिम श्वासापर्यंत लढणार

तर, राहुल गांधींनीदेखील तुमचे प्रेम हीच माझी ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर तुमच्यासाठी अंतिम श्वासापर्यंत लढणार, असे ट्विट केले आहे.

कृष्ण कुमार पांडे यांना श्रद्धांजली

काल नांदेडमध्ये यात्रेदरम्यानच काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली वाहत राहुल गांधी व त्यांच्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेला सुरुवात केली.

अशी आहे आजची यात्रा

सकाळी ६ वाजता – शंकरनगर, रामतीर्थ, बिलोली येथून यात्रेला सुरुवात
सकाळी १० वाजता – कुसुम लॉन्स, नायगाव येथे थांबणार
सांयकाळी ४ वाजता – पदयात्रेला सुरुवात
सायंकाळी ७ वाजता – कुशनुर एमआयडीसी गेट, नायगाव येथे थांबणार
रात्री मुक्काम – विरजगाव फाटा, नायगाव येथे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *