श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघामध्ये भाजपची तयारी सुरू, सुषमा अंधारेंचा मोठा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ नोव्हेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. पण, आता भाजपने त्यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघात तयारी सुरू केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुढील सहा ते सात महिन्यात शिंदे सरकारमध्ये असंतोषाचा स्फोट होईल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं.

शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.

‘शिंदे गटाची उपुक्तता आता भाजपसाठी संपलेली आहे. ती फक्त सरकार स्थापन करण्यासाठी होती. भाजप यात यशस्वी झाली आहे. बीकेसी मैदानावर मेळावा घेतला तेव्हा शिंदे गटाची किती ताकद आहे, यात शिंदे गट उघडला पडला आहे. त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला गृहीत धरत नाही, त्यांच्या मुळावर उठला आहे. भाजपने आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांना मधल्या काळात थोडी सवलत मिळाली होती. जर सरनाईक यांनी आपला मतदारसंघ सोडला नाहीतर ईडीकडून संपत्तीवर टाच आणली जाईल, असा दावा अंधारे यांनी केला.

तसंच, ;आढळराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दौरा केला होता. एवढंच नाहीतर संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये सामील झाले होते. ते गुवाहाटीला गेले होते. शिरसाट हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलले होते. ज्या मुलांना दत्तक घेतलं त्यांची भाजप काळजी घेत आहे. पण त्यांची मुलं उघडी पडली आहे. त्यामुळे असंतोषाच्या राजकारणाचा लवकरच भडका उडेल. हे सरकार फार फार 5 ते 6 महिने टिकणार नाही, असा दावाही अंधारे यांनी केला.

‘संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये नाराज आहे. अब्दुल सत्तार यांच्या सभेला जे एकाच भागात येतात. त्या सभेकडे शिरसाट यांनी पाठ फिरवली होती. विशेष म्हणजे, त्यांना निमंत्रण सुद्धा होते. पण तरीही ते आले नाही. आता एकाच भागात किती लोकांना मंत्रिपद दिले जातील. अतुल सावे, संदीपान भुमरे, सत्तार यांना मंत्रिपद दिलं. आता याच भागात आणखी किती नेत्याला मंत्रिपद दिली जाणार, याची शक्यता आता मावळली आहे. एवढंच नाहीतर नेतपदाची यादी जाहीर झाली होती, त्यामध्ये सुद्धा शिरसाट यांच्या तोंडाला पानं पुसली. नेते, उपनेते पद सुद्धा शिंदे गटाने दिलं नाही, असं म्हणत संजय शिरसाट शिवसेनेत परत येतील, असंही अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *