जॅकलिनचा आरोप- त्रास देत आहे ED:कोर्टाने तपास यंत्रणेला विचारले- पुरावे होते तर अटक का केली नाही?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर उद्या म्हणजेच 11 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. याप्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान EDने सांगितले की, जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे तिला नियमित जामीन देऊ नये.

त्यावर न्यायालयाने EDला विचारले की, जर पुरावे आहेत तर तुम्ही अद्याप जॅकलिनला अटक का केली नाही? या सुनावणीवेळी जॅकलिनसोबत पिंकी इराणीही पटियाला हाऊस कोर्टात हजर होती. पिंकीवर सुकेशकडून पैसे घेऊन जॅकलिनला पोहोचवल्याचा आरोप आहे.

जॅकलिन म्हणाली की, EDने मला फक्त त्रासच दिला

जॅकलिन कोर्टरूममध्ये आपला बचाव करताना म्हणाली, ‘मी याप्रकरणी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. मी स्वत: या प्रकरणात आत्मसमर्पण केले आहे, परंतु EDने मला फक्त त्रास दिला आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जात राहते, पण मला परदेशात जाण्यापासून रोखले गेले. मला माझ्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही.

जॅकलिन पुढे म्हणाली, ‘मी या सर्व गोष्टींसाठी तपास यंत्रणेला ईमेल केला होता, पण त्याचेही उत्तर आले नाही. त्यांनी आरोप केला की, मी देश सोडून पळून जाणार आहे. मग त्यांनी मला LOC (लुक आऊट सर्कुलर) जारी करून थांबवले. EDचे सर्व आरोप निराधार आहेत.

EDच्या वतीने वकिलाने सांगितले की, जॅकलिन ही परदेशी नागरिक आहे. तिचे कुटुंब श्रीलंकेत राहते. जॅकलिनने डिसेंबर 2021 मध्येही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

22 ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने जामीन याचिकेवर सुनावणी करताना जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतरही EDने जामीन निर्णयाला विरोध केला होता. एजन्सीने आरोप केला होता की, जॅकलिनने कधीही तपासात सहकार्य केले नाही, पुरावे समोर आल्यानंतरच सर्व खुलासे झाले आहेत. EDने असेही म्हटले आहे की, तिने भारतातून पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु LOC जारी ती असे करू शकली नाही.

ईडीच्या रिपोर्टनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान सांगितले होते की, ती आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते, त्यामुळे तिने सुकेशकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेतल्या होत्या.

गेल्या वर्षी EDने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे आमिष दाखवून त्यांच्या पत्नींकडून 200 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली होती.

EDने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. EDच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे.

जॅकलिन-सुकेश रिलेशनशिपमध्ये होते, जॅकलिनने EDच्या चौकशीत दिली कबुली

या प्रकरणाच्या सुरुवातीला जॅकलीन आणि सुकेशच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. सुकेशला डेट करत असताना तिला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामध्ये दागिने, क्रोकरी, चार पर्शियन मांजरी आणि एक घोडा यांचा समावेश होता. पर्शियन मांजरीची किंमत 9 लाख रुपये आहे. त्याचबरोबर घोड्याची किंमत 52 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय सुकेशने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले. या रिंगमध्ये J आणि S बनवले गेले. सुकेशने जॅकलिनच्या फॅशन डिझायनर लिपाक्षीच्या खात्यावर 3 कोटी रुपयेही पाठवले होते. या पैशातून लिपाक्षीने डिझायनर कपडे, कार आणि जॅकलिनच्या आवडीचे गिफ्ट्स तिला दिले होते. EDच्या चौकशीदरम्यान जॅकलिनने तिचे नातेसंबंध आणि भेटवस्तू मिळाल्याची कबुली दिली होती.

EDचा दावा – जॅकलिनला सुकेशचे वास्तव माहिती होते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, EDचा असा विश्वास आहे की, जॅकलिनला पहिल्यापासूनच माहिती होते की या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर हा फसवणूक करणारा आहे आणि तो खंडणीखोरी करतो. त्यांचे अनेक खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर EDने जॅकलिनची चौकशी केली आणि दोघांचे फोटो पुरावे म्हणून ठेवले.

या प्रकरणात नोरा फतेहीचेही नाव आले होते

या प्रकरणात जॅकलिनसह नोरा फतेही, चाहत खन्ना आणि नेहा कपूर या अभिनेत्रींची नावे समोर आली होती. नोरा या खटल्यात सरकारी साक्षीदार बनली आहे. डिसक्लोझर स्टेटमेंटनुसार सुकेशने शिल्पा शेट्टीशीही संपर्क साधला होता. राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा तुरुंगात असताना सुकेशने शिल्पासोबत त्याच्या सशर्त सुटकेबद्दल संपर्क केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *