जितेंद्र आव्हाड यांना अटक, ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांची निदर्शने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर ठाण्यात वर्तक नगर पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. आव्हाडांच्या अटकेविरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी निदर्शनास आणून दिला, यावरुन त्यांनाच अटक करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या सरकारमध्ये भर गर्दीत बंदूकीतून गोळी झाडणाऱ्या आमदाराला अटक केली जात नाही, सरकार बळाचा वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ठाण्यातील (Thane) मॉलमधील मारहाणीप्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. ठाण्यातील विवियाना मॉलमधील (Viviana Mall) सिनेमागृहात ‘हर हर महादेव सिनेमा’वरुन वाद झाला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये रात्री दहा वाजता हर हर महादेव या मराठी सिनेमाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्ते सिनेमागृहात शिरले आणि त्यांनी सिनेमाचा शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांनी विरोध केला असताना कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केली. यानंतर मनसे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी बंद पडलेला शो पुन्हा सुरु करत आव्हाडांवर जोरदार टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *