Inflation | महागाईचे दणके ; आता जेवणाच्या ताटावर बसण्यापूर्वीही विचार करावा लागणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । देशात गेल्या पाच वर्षांत सर्वच वस्तूंच्या (Price) प्रचंड वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधन, घरगुती आणि व्यावसायिक वापराचा सिलिंडर, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमती वेगानं वाढत आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलने (Petro Diesel Rate) तर रॉकेट भरारी घेतली आहे. तशीच जरबदस्त भाव वाढ तांदूळ आणि डाळ (Rice and dal) वस्तूंमध्ये झालेली आहे. देशभरात लहरी हवामान, (Windy weather) पावसाचा खरिपाला फटका (Heavy rain) बसलाय. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

साध्या तांदळाच्या किंमती पुन्हा भडकू (Rice prices will rise ) शकतात. खरिपाचे मातेरे झाले आहेत. काही राज्यात तुफान (maharashtra Heavy rain पाऊस झाला आहे. तर काही भागात पावसाने डोळे वटारले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. खरिपाचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षीपेक्षाही उत्पादनाचा आकडा कमी होणार आहे.

दरम्यान तांदूळ, (Rice prices will rise ) डाळींच्या किंमती कडाडण्याची शक्यता आहे. खरिपात एकूण पेरणीत (sowing) देशभरात (Inflation in India) साडेनऊ टक्क्यांची घट झाली. कडधान्यांच्या उत्पादनातही पाच टक्के घट झाली. त्यामुळे दरवाढ अटळ असल्याचं मानलं जातंय. यंदा पीक कमी असल्याने हळूहळू दर वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. तसेच पुढील वर्षी उन्हाळ्यादरम्यान डाळी आयात कराव्या लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. देशभरात लहरी हवामान, पावसाचा खरिपाला फटका बसलाय. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यांतील जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तांदळासाठी लागणारा पाऊस अनेक भागात फिरकलाही नसल्याने अनेक भागातील तांदळाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे.

तांदूळ पेरणीत 20.6 लाख हेक्टरची घट
कडधान्याची पेरणी 5.53 लाख हेक्टरची घट
तुरीच्या पेरणीत 2.14 लाख हेक्टरची घट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *