महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,८१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,३६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६१,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१६० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८४० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१७ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)