CNG भरताना कारमधून का उतरतात? जाणून त्यामागचं कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । आपल्यापैकी अनेकजण कारमध्ये सीएनजी भरताना कारमधून खाली उतरले असतील. प्रत्येक सीएनजी पंपावर हा अनुभव प्रत्येकाला आला असेलच, परंतु गॅस भरताना आपणाला खाली का उतरवले जाते याबाबत अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात दिलं आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेकजण सीएनजी कारचा वापर करायला लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून देशात सीएनजी कारची मागणी मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आपण देखील या कारमधून अनेक वेळा प्रवास करतो.

मात्र, या प्रवासादरम्यान सीएनजी पंपावर गॅस भरायला गेल्यावर आपणाला कारमधून खाली उतरण्यास सांगितलं जाते. सीएनजी भरण्याबाबतच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार गाडीमध्ये गॅस भरताना गाडीमध्ये कोणीही बसलेलं नसावं याची खबरदारी घेतली जाते. कारण कारमध्ये सीएनजी भरताना गॅसची टाकी लिकेज होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये त्यासाठी गाडीतून खाली उतरायला सांगितलं जातं. कारण जरी गाडीचा स्फोट झाला तरी सर्व लोक गाडीबाहेर सुरक्षित रहावेत यासाठी आपणाला कारमधून उतरण्यास सांगितले जाते.

वरती सांगितल्याप्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक लोकांची पसंती सीएनजी कारना आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यानी सीएनजी किट असणाऱ्या गाड्यांचे उत्पादन वाढवलं असून अनेक लोकं त्या गाड्या खरेदी करतात देखील. मात्र काही लोकांकडे आधीपासून असणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील गाड्या वापरणं महागात पडत असल्यामुळे ते गाडीला सीएनजी किट लावून घेतात.

मात्र, बाहेरुन लावण्यात आलेल्या कीटचे सेटींग्ज बरोबर असेलच याची खात्री नसते त्यामुळे या धावत्या गाड्यामध्ये आग लागण्याची शक्यता असते. शिवाय गॅस भरताना या बाहेरुन बसवण्यात आलेल्या किटमुळे गाडीत स्फोट होण्याची शक्यता असते याची खबरदारी म्हणून आपणाला सीएनजी भरताना गाडीतून खाली उतरवलं जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *