राष्ट्रवादीत लवकरच फाटाफुट ; बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळं त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. काही दिवस गेले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) मोठी फाटाफुट होणार आहे. त्यांचे अनेक खासदार-आमदार, नेते भाजप (BJP) आणि शिंदे गटात दाखल होतील, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विरोधक सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल (Shinde-Fadnavis Government) काही ठिकाणी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळं त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. काही दिवस गेले की राष्ट्रवादीत मोठी फुटाफुट होणार आहे. त्यांचे खासदार-आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बावनकुळे पुढं म्हणाले, आमच्याकडं 164 चं बहुमत आहे. यापुढं जर बहुमत मागीतलं तर 185 चं बहुमत दिसेल. आता विरोधी पक्षांनी चिंता सोडावी, विरोधी पक्षाचं काम करावं. त्यांना चांगली संधी विरोधी पक्षात काम करायची मिळाली आहे. 2019 मध्येच ती मिळणार होती. मात्र, बेईमानीनं सरकार मिळवलं. म्हणून अडीच वर्षे सत्ता मिळाली. शिंदे-फडणवीस सरकार अनेक वर्षे सत्तेवर राहणार आहे. त्यामुळं आतातरी किमान दहा-वीस वर्षे विरोधी पक्षाचं चांगलं काम करावं, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *