महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात क्राईम ब्रॅंचने आठ काेटींच्या बनावट नाेटा केल्या जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ नोव्हेंबर । ठाणे गुन्हे शाखेच्या (Thane Crime Branch) युनिट पाचने आज (शनिवार) दाेन हजार रुपयांच्या एकूण आठ कोटी बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दाेघांना अटक केली आहे. या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी दाेघांचा प्रयत्न हाेता असे पाेलिसांनी सांगितले.  

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार तपासादरम्यान दाेघांकडून दाेन हजार रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून एकूण चारशे बंडल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

पोलिसांचे पथक या नोटा छापणाऱ्या कारखान्याचा शोध घेत असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४८९ (ए), ४८९ (ब), ४८९ (सी) आणि ३४ अन्वये गमोहन कासारवडवली (thane) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *