महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ नोव्हेंबर । सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा (Team India) इंग्लंड टीमने (ENG) पराभव केला. तर पाकिस्तान टीमने न्यूझिलंड (NZ) टीमचा पराभव केला. उद्या रविवारी विश्वचषक स्पर्धेतील फायनल मॅच होणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातला महामुकाबला उद्या चाहत्यांना मैदानात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत इंग्लंडच्या टीमने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तान टीमची कामगिरी खडतर राहिली आहे. सोशल मीडियावर इंग्लंडची टीम विश्वचषक जिंकेल अशी चर्चा सुरु आहे.
मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर उद्या दुपारी दीडवाजल्यापासून चाहत्यांचा इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया दोन्ही टीममधील महत्त्वाचे मुद्दे
# दोन्ही टीमनी एकमेकांविरुद्ध दोनशेच्यावरती धावसंख्या केली आहे. पाकिस्तानच्या टीमच्या नावावर अधिक धावसंख्येची नोंद आहे. 2021 इंग्लंडविरुद्ध 6 गडी गमावून 232 धावा केल्या होत्या.
# 2010 मध्ये झालेल्या कार्डिफ T20 मध्ये पाकिस्तानचा संघ अवघ्या 89 धावांत ऑलआऊट झाला होता.
# विश्वचषकाच्यापुर्वी इंग्लंडने पाकिस्तानचा लाहोरमध्ये 67 धावांनी पराभव केला.
# पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर अधिक धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे, त्याने 15 मॅचमध्ये 560 धावा काढल्या आहेत.
# नुकत्याचं पाकिस्तानमध्ये मालिकेमध्ये बाबर आझमने 66 चेंडूत 100 धावा काढल्या आहेत.
# मोहम्मद रिझवानने सहावेळी 50 अर्धशतकी पारी खेळली आहे.
# विश्वचषकाच्यापुर्वी झालेल्या T20 मालिकेत ईयान मोर्गनने 17 षटकार मारले आहेत.
# माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान, आदिल रशीद यांनी पाकिस्तानविरुद्ध 17-17 विकेट घेतल्या आहेत.
# सईद अजमलने 2012 मध्ये झालेल्या मॅचमध्ये 23 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या
# आदिल रशीदने पाकिस्तानविरुद्ध 28 पैकी 18 सामने खेळले आहेत.