महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । सोने आणि चांदी खरेदीला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सोने-चांदीच्या किमतीत तेजी झालेली दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX वर सोन्याची किंमत) आज सोन्याचा भाव 52000 रुपयांच्या पुढे गेला आहे. सोने दरात 480 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 62000 च्या वर आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल सांगायचे झाले तर, येथे सोने किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे.
सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 52210 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. तसेच चांदीचा दर 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 62166 रुपये प्रति किलो झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल…
जागतिक बाजारपेठेत सोने-चांदी यांच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत सांगायचे झाले तर, येथील सोनेचा दर 2.71 टक्क्यांनी वाढून $1,751.91 प्रति औंस झाला. त्याचवेळी, चांदीची स्पॉट किंमत 3 टक्क्यांनी वाढून $ 21.65 प्रति औंसवर पोहोचली आहे.