महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन आणि त्यांच्या पतीसह इतर तिघांची तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली. दरम्यान राहुल, प्रियंका किंवा गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा माझा कोणताही विचार नाही असं वक्तव्य नलिनी श्रीहरन यांनी केलंय. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले. मी निर्दोष आहे या एकाच दृढ विश्वासाने मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं असंही त्या म्हणाल्या..