मुसळधार पावसातही माणुसकीचा अन्नदानाचा दीप उजळला

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -पिंपरी : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना काही हात मात्र मदतीसाठी पुढे सरसावले. पाऊस, चिखल आणि अडचणींची पर्वा न करता Mahalaxmi Events & Caterers यांच्या ‘स्पर्श ममतेचा – Task 2’ या उपक्रमातून गरजू आणि भुकेल्या नागरिकांपर्यंत प्रेमाने तयार केलेले घरगुती अन्न पोहोचविण्यात आले. हा उपक्रम केवळ अन्नदानापुरता मर्यादित न राहता, समाजात माणुसकी, आपुलकी आणि सेवाभावाची उब जपणारा ठरला. प्रत्येक सहभागी मैत्रिणीने स्वतःच्या घरातील अन्न प्रेमाने तयार करून गरजूंच्या हातात दिले आणि ‘भुकेल्याला अन्न देणे हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला. प्रतिकूल परिस्थितीतही सेवा थांबत नाही, हे या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले.

या सेवायज्ञात Sonu Joshi, Rekha Kambale, Poonam Mahindrakar, Amruta Surve, Manisha Samarth, Pournima Kulkarni, Chetana Bidave, Rakhee Yewale, Kimaya Mhatre, Amruta Hamand, Pallavi Mayane, Akanksha Kulkarni, Vaishali Kote, Prerana Kulkarni, Poonam Lokhande, Nisha Patil, Dhanashri Joshi, Kanta Pawar, Rupali Lavand, Shravani Joshi आणि Prajakta Gandhe यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. तसेच Komal Pardeshi, Harshada Durge, Ashwini Kumbhar, Rupali Danavle, Archana Tupe, Ankita Pabale, Neha Dharapale, Priti Bhujbal, Dipali Polkade, Trupta Kumbhar, Sonam Shahapure, Pooja Darawade, Shruti Menasagi, Manisha Shirasat, Antara Nale, Alka Bhujbal, Jyoti Dalavi, Supriya Kolekar, Prajakta Deomare आणि Arati Karagaonkar यांनीही या उपक्रमात मोलाची साथ देत अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवले. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेमुळे अन्नासोबतच प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीची ऊबही गरजूंपर्यंत पोहोचली.

उपक्रमाच्या आयोजकांनी सर्व सहभागी मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. तसेच, नजरचुकीने एखाद्या सहभागीचे नाव राहिले असल्यास संबंधितांनी आपला व्हिडिओ पुन्हा पाठवावा, त्यांचे नाव पुढील यादीत सन्मानाने समाविष्ट केले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘प्रत्येक शुक्रवारी एका भुकेल्या जीवाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवूया’ हा संदेश देत ‘स्पर्श ममतेचा’ हा उपक्रम समाजात संवेदनशीलतेची नवी ज्योत प्रज्वलित करत आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात अशा उपक्रमांमुळे समाजातील माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा विश्वास दृढ होतो. सेवा, प्रेम आणि करुणेच्या या वाटेवरून अधिकाधिक हात जोडले गेले, तर समाजात भुकेपेक्षा माणुसकीचा विजय अधिक मोठा ठरेल, असा आशावादही या उपक्रमातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *