![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात स्थैर्य आणावे लागेल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका. संपर्कातील लोकांच्यात आपली माणसे ओळखा. आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामाला अपेक्षित गती येईल. आजचा दिवस चांगला जाईल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक चिंता सतावतील. अति विचारात भरकटू नका. घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल. दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावे. छंद जोपासण्यात वेळ घालवा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. आर्थिक कामे जपून करावीत. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.