Horoscope Today दि. ५ जुलै २०२६ ; आज अपचनाचा त्रास जाणवेल. ….………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Today Aries Horoscope)
आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खाल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Today Taurus Horoscope)
वाणी सौम्य ठेवून वागाल. मैत्रीपूर्ण संबंध जपावेत. कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ संभवतो.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Today Gemini Horoscope)
स्थावरचे व्यवहार सुसह्य होतील. कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी. भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल. स्वत: विषयक चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

कर्क राशीचे राशिभविष्य (Today Cancer Horoscope)
जोडीदाराशी विसंवादाची शक्यता. तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी कराल. वरिष्ठांना खुश ठेवावे.

सिंह राशीचे राशिभविष्य (Today Leo Horoscope)
घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे. आभ्यासू लोकांचा सहवास लाभेल. नवीन विचार जाणून घ्याल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Today Virgo Horoscope)
फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे. मतभिन्नता दर्शवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचा त्रास जाणवेल.

तूळ राशीचे राशिभविष्य (Today Libra Horoscope)
दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात. तिखट व तामसी पदार्थ खाल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Today Scorpio Horoscope)
कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागिदारीतून लाभ उठवाल.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope )
जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.

मकर राशीचे राशिभविष्य (Today Capricorn Horoscope)
सहकार्‍यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Today Aquarius Horoscope)
नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल. बाग कामात मन रमेल. अनावश्यक खर्च टाळावा.

मीन राशीचे राशिभविष्य (Today Pisces Horoscope)
इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *