महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । शिवसेना खासदार संजय राऊत मागील जवळपास १०० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. त्यांना 9 नोव्हेंबरला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संजय राऊतांची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
१०० दिवस मी सुर्यप्रकाश पाहिला नाही. तुरुंगात प्रकाश असतो. त्याचा मला फार त्रास झाला. मला आता दिसत नाही. नजर माझी कमी झाली आहे. नजरेचा मला त्रास झाला. अनेक व्याधी मला जडल्या पण मला त्याच भांडवल नाही करायच. मी हार्ट पेशेंट आहे. मी सगळं तिथ सहन केलं.
चहासाठी पण तडफडाव लागतं. अनेकदा मी कोरा चहादेखील पिला आहे. या गोष्टी सांगून मला सहानभूती मिळवायची नाही. माझ्या मुलींच्या डोळ्यात मला अश्रु पाहायचे नाहीत. अशा भावना राऊत यांनी व्यक्त केली.
मला कानान कमी ऐकु यायला लागलं. कारण आवाजच नाही. वाचन नाही. एकांतवास काय असतो तो तिथं अनुभवलं. समोर फक्त उंच भिंत बाकी काही दिसत नाही. त्या भितींशीच बोलत होतो. स्वतःशीच बोलत होतो. मला लिहिण्याची परवानगी होती. यावेळी मी दोन पुस्तक लिहिली. मला जे अनुभव येत होते. ते लिहित होतो. तिथे काही पुस्तक होती. ती मी वाचत होतो. त्या पुस्तकाचा संदर्भ घेत मी दोन्ही पुस्तक लिहिली.
तसेच, शेवटच्या दिवशी बाहेर पडताना मला जेलच्या अधिकाऱ्यांनी पैसे दिले. मी तीन महिने पैसे पाहिले नव्हते. हे पैसे कसले असे विचारले असता. हे पैसे तुमचे कमाई आहे असे त्यांनी सांगितले. तुमचे पैसे आमच्याकडे शिल्लक आहेत. आतमध्ये जगण्यासाठी मनी ऑर्डर पाठवले जातात. खाण्याचा पाण्याच खर्च असतो तो दिला जातो. त्यातुन हे राहिलेल पैसे आहेत.
मला एकएक रुपयाच महत्त्व, खाण्याच, पाण्याच, अथरुण, स्वातंत्र्य काय असत, जमीन, प्रकाश यासर्वांची जाणीव होते.
तुम्ही एकांत वास भोगा, तिथं गेल्यावर विस्मरण होत. समोरच्या व्यक्तीच नाव लवकर आठवत नाही. एक महिन्यानंतर शब्द आठवत नाहीत. तुमची कपडे कुठे आहेत ते आठवत नाही.