![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मार्च २०२६ ।।पुणेकरांसाठी भन्नाट बातमी! रोजच्या प्रवासासाठी वापरली जाणारी Pune Metro आता तुमच्या चवीचीही काळजी घेणार आहे. कारण, शहरात पहिल्यांदाच ‘मेट्रो कोच रेस्टॉरंट’ सुरू होणार आहे—जिथे तुम्ही थेट मेट्रोच्या डब्यात बसून एसी वातावरणात जेवणाचा आनंद घेऊ शकणार आहात!
हे खास रेस्टॉरंट District Court Metro Station परिसरात उभारण्यात आलं आहे. जुन्या मेट्रो कोचचा भन्नाट मेकओव्हर करून त्याला आलिशान रेस्टॉरंटमध्ये बदलण्यात आलं आहे. आतमध्ये बसण्याची व्यवस्था, आकर्षक इंटीरियर आणि थंडगार वातावरण—सगळं काही एकदम ‘हटके’ अनुभव देणार आहे.
या प्रकल्पामागे MahaMetro चा मोठा प्लॅन आहे. केवळ प्रवासी सेवा न देता, तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न वाढवणं आणि लोकांना नवीन अनुभव देणं हा यामागचा उद्देश आहे. दरमहा सुमारे १.४५ लाख रुपयांचा महसूल या रेस्टॉरंटमधून मिळण्याची अपेक्षा आहे.
वनाझ–रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्याचबरोबर पर्यटकांसाठीही हे रेस्टॉरंट आकर्षण ठरणार आहे. “कमी दरात चांगल्या सुविधा” देण्याचा दावा करत हे रेस्टॉरंट लवकरच सर्वांसाठी खुलं होणार आहे.
👉 थोडक्यात:
आता पुण्यात ‘मेट्रो’ म्हणजे फक्त प्रवास नाही—तर ‘टेस्ट’ही! फिरायला जा आणि थेट मेट्रोत बसून जेवणाचा नवा अनुभव घ्या! 😋

