नशिब ; मागचा वर्ल्ड कप कॅच सोडून गमावला ; आता कॅच पकडून झाला पाकिस्तानचा गेम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ नोव्हेंबर । क्रिकेटमधील सामन्यांमध्ये झेल (Catch) घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे अनेक क्रिकेटपटूंकडून आपण ऐकले आहे. फलंदाजाने मारलेल्या चेंडूचा झेल घेतल्यास सामन्याचा रोख कधीही बदलू शकतो असं दिसतं आणि हेच नेमकं घडलं इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या अंतिम सामन्यामध्ये. पण पाकिस्तानसाठी हा झेल त्यांच्यासाठी मोक्याच्या क्षणी असला तरी त्यामुळे त्यांचे टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. दुसरीकडे, २०२१ मध्ये हसन अलीकडून मॅथ्यू वेडचा झेल सोडल्यानंतर सामना उलटला आणि पाकिस्तानचा पराभव झाला.पाहूया या सामन्यात काय घडलं….

आता तुम्ही विचार करत असाल की इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला झेल घेणे कसे काय महागात पडले, तर आम्ही तुम्हाला सांगतो की शाहीन शाह आफ्रिदीने १३व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हॅरी ब्रूकचा झेल टिपला. शादाब खानच्या चेंडूवर तो झेल घेतला. या विकेटनंतर इंग्लंड दडपणाखाली आला. नसीम शाहने १४व्या षटकात फक्त दोन धावा दिल्याने इंग्लिश संघावरील दबाव आणखी वाढला. या दबावाचा फायदा घेण्याची गरज होती, पण शाहीन शाहला गोलंदाजी करता आली नाही.

शादाबच्या चेंडुवरचा झेल घेत असताना त्याच्या पाय मुरगळला. यानंतर शाहीन काही काळ मैदानाबाहेर गेला. त्याला चालताना त्रास होत होता. अशा परिस्थितीत हारिस राऊफला चेंडू देण्यात आला, त्यानंतर या षटकात ८ धावा झाल्या. शाहीनला १६ वे षटक देण्यात आले. त्याला दुखापत झाली होती, पण तरीही त्याला गोलंदाजी करायची होती. मात्र, पहिल्याच चेंडूनंतर तो मैदानाबाहेर परतला आणि इफ्तिखार अहमदने षटक पूर्ण केले. या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार ठोकला.

पुढच्या म्हणजे १७व्या षटकात मोईन अलीने मोहम्मद वसीम ज्युनियरला ३ चौकार मारून फासे उलटवले. त्याचा परिणाम असा झाला की, इंग्लंडला एक षटक बाकी असताना लक्ष्य गाठण्यात यश आले. शाहीनने आपली दोन्ही षटके जर पूर्ण केली असती तर कदाचित पाकिस्तानला संधी मिळू शकली असती. किमान कर्णधार बाबर आझमचा तरी असा विश्वास आहे. अहमदने त्या षटकात १३ धावा दिल्या ज्यात बेन स्टोक्सच्या एका षटकार आणि चौकाराचा समावेश होता. त्यामुळे इंग्लंडवरील दबाव कमी झाला.

बाबर सामन्यानंतर म्हणाला, ‘जर शाहीनने ते षटक टाकले असते तर परिस्थिती वेगळी असती. त्यानंतर दोन डावखुरे फलंदाज (स्टोक्स आणि मोईन अली) क्रीजवर होते आणि म्हणून मी ऑफस्पिनरकडे चेंडू दिला. तो म्हणाला, ‘आम्ही भागीदारी राखू शकलो नाही, त्यामुळे आम्ही बॅकफूटवर गेलो. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली पण हा काही बहाणा नाही करत आहे मी. आम्ही परिस्थितीनुसार खेळलो पण २०व्या षटकापर्यंत आमच्यावर दबाव होता. शाहीन असता तर गोष्ट वेगळी असती.

दुसरीकडे, टी-२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत, हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला, जे पाकिस्तानला महागात पडले. या सामन्यात वेडने पाकिस्तानी गोलंदाजीची हवाच उडवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *