Ajit Pawar: आव्हाडांपासून मुख्यमंत्री पाच-दहा फुटांवरच, विनयभंग झाला नाही, हे त्यांनीच सांगायला हवं: अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ नोव्हेंबर । जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जो काही प्रकार घडला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी पाच ते दहा फुटांवर उभी होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनीच त्याठिकाणी विनयभंगासारखा प्रकार घडला नाही, हे समोर येऊन स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. मी या प्रकाराचा व्हिडिओ स्वत: पाहिला. त्याठिकाणी पोलीस अधिकारीही उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सगळ्यांना बाजूला व्हा, सांगत होते. त्यांनी एका भगिनीला थोडसं बाजूला करुन ते स्वत: गेले. यापेक्षा जास्त काहीही झालेले नाही. हा प्रकार घडला तेव्हा मुख्यमंत्री पाच ते दहा फुटांवर होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे, असं काही घडलेलं नाही. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. कशाही पद्धतीने तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही राज्यातील १३ कोटी जनेतेचे प्रतिनिधी आहात, असे अजित पवार यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *