ना खंत, ना खेद ! श्रद्धाला निर्घृणपणे संपवणारा आफताब जेलमध्ये काय करतोय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । पालघरची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. प्रियकर आफताब अमीन पुनावालानं श्रद्धाला निर्घृणपणे संपवलं. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी एक फ्रिज आणला. आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा घेऊन रोज रात्री २ वाजता घरातून निघायचा. मृतदेहाचा तुकडा जंगलात फेकून तो घरी परतायचा. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.

श्रद्धाशी संपर्क होत नसल्यानं, तिच्या मित्रमैत्रिणींकडूनही ख्यालीखुशाली न कळल्यानं श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आफताबला अटक केली. चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आफताब सध्या तुरुंगात आहे. तुरुंगातील त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला दिसत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली. त्याच्या बोलण्यात पोलिसांना कोणताच खेद जाणवला नाही. श्रद्धाला निर्घृणपणे संपवल्याबद्दल त्याला कोणतीच खंत नाही. पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *