खर्च जपून करा ; जगातील चौथ्या क्रमांकावरील श्रीमंत व्यक्ती वारंवार ही घोषणा का करतेय…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । सध्या जगभरात मंदीचं वातावरण (Financial Crisis) घुमू लागलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आता थेट तुमच्या पैशांवर (Money) होणार आहे. 2023 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप अटीतटीचं राहणार आहे. 2020-21 च्या कोविड महामारीनंतर (Covid Health Crisis) आता जगावर एक नवं मोठं संकट उद्भवणार आहे आणि हे संकट (Recession) राहणार आहे आर्थिक मंदीचं. आपल्या सर्वांनाच नोव्हेंबर – डिसेंबर हे दोन महिने खूप जपून खर्च (Spending) करावे लागणार आहेत. आपण अनेकदा वायफळ खर्च (How can I save my money) करत असतो तेव्हा असा वायफळ खर्च सोडला तर आपल्याला बचत (Savings) करावी लागणार आहे. जगातल्या या श्रीमंत व्यक्तीकडून (Rich People of the World) सामान्य नागरिकांना बचत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपल्याला पुढील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया नक्की या मंदीचं स्वरूप कसं असेल. (jeff bezos says its time to save money in upcoming recession)

प्रथम जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे टॉप 5 मधले उद्योगपती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. बेझोस यांनी काय म्हटलं ते आपण पाहूया. बेझोस म्हणतात आर्थिक मंदीचे सावट पुढल्या वर्षी राहणार आहे. तेव्हा खर्च जपून करा, कारण आपल्याला आता आपले रिसोर्सेस (Resources) आणि पैसे (Saving Money) यांची बचत करायची आहे, असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.

जगाला सल्ला देणारे बेझोस नक्की काय करतात?
बेझाेस यांनी संपत्तीतील बहुतांश हिस्सा कल्याणकारी याेजनांमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येते आहे. जेफ बेझाेस हे ॲमेझाॅनचे (Amazon) संस्थापक आहेत. बेझोस यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मी माझ्या संपत्तीचा (Who is Amazon’s CEO) बहूतांश हिस्सा दान करणार आहे. हवामान बदलासंबंधी (Climate Change) समस्यांवर काम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. ज्याचा ज्यात मानवतेला फायदा होईल यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्याने सांगितले आहे. जेफ बेझाेस यांच्याकडे 124 अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे. जगातील सर्वांत श्रीमंत (Richest Person) व्यक्तींच्या यादीत ते चाैथ्या क्रमांकावर आहेत.

काय स्वरूपाची आहे मंदी?
आर्थिक मंदीचा धोका अमेरिका (America) या देशाला कायम आहे. या देशातील लोकांना महागड्या वस्तूंची खरेदी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. या मंदीचा फटका जगालाही बसणार आहेत. ज्याची प्रमुख कारणे आहेत एक म्हणजे कोविड महामारी आणि दुसरं म्हणजे रशिया – युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि तिसरा फटाका बसला आहे तो क्रुड तेलाचा (Crude Oil). त्यातून हवामान बदल हाही एक प्रश्न जगासमोर आहे. ज्याप्रमाणे कोविडच्या काळात शेअर मार्केट (Share Market) उंचावते होते त्याप्रमाणे या मंदीत शेअर मार्केटची स्थिती काय आहे हा येणारा काळच ठरवेल. परंतु येत्या काळात आपल्याला फक्त पैसेच नाहीत तर आपली संसाधनंही वाचवायची आहेत. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *