मेस्सी, रोनाल्डो कतार में! वर्ल्ड कपनंतर अनेक दिग्गज होणार निवृत्त

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप संपला असून आता फिफाच्या फुटबॉल वर्ल्ड कपचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. रविवारपासून अवघे क्रीडाविश्व फुटबॉलमय होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये स्टार खेळाडूंचा खेळ ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी फुटबॉलशौकिनांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. मात्र लियोनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासह आठ दिग्गज खेळाडूंसाठी यंदाचा फुटबॉल वर्ल्ड कप अखेरचा असू शकतो. त्यामुळे अनेक दिग्गज निवृत्तीच्या कतार में आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यातील बहुतांश खेळाडूंनी वयाची पस्तिशी गाठली असून आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत ते चाळिशीपर्यंत जाणार आहेत. त्यामुळे हे सर्व अनुभवी खेळाडू आपापल्या संघासाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसणार यात वादच नाही.

लियोनेल मेस्सी (अर्जेंटिना) ः जगाच्या कानाकोपऱ्यात फॅन्सची मोठी संख्या असलेला लियोनेल मेस्सी आता 35 वर्षांचा झालाय. चार वर्ल्ड कपमध्ये 19 सामन्यांत त्याने 6 गोल केले आहेत. ब्राझीलमध्ये 2014 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मेस्सी ‘गोल्डन बॉल’ पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) ः 37 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने आतापर्यंत चार वर्ल्ड कप खेळले आहेत. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 17 सामने खेळले असून 7 गोल केले आहेत. 2006 मध्ये पोर्तुगालचा संघ चौथ्या स्थानी राहिला होता.

लुईस सुआरेज (उरुग्वे) ः आतापर्यंत 3 वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा लुईस सुआरेज आता 35 वर्षांचा झालाय. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले असून 7 गोल केले आहेत.

रॉबर्ट लेवानडोस्की (पोलंड) ः 38 वर्षीय रॉबर्ट लेवानडोस्की फुटबॉल महापुंभातील पहिला गोल करण्यासाठी आतूर असेल. कारण मागील वर्ल्ड कपमध्ये त्याची गोलची पाटी कोरीच राहिली होती. आगामी वर्ल्ड कप त्याचा अखेरचा वर्ल्ड कप असू शकतो.

करीम बेंजेमा (फ्रान्स) ः 2014 मध्ये करीम बेंजेमाने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केले होते, मात्र 2018 च्या स्पर्धेत त्याचा संघात समावेश नव्हता. यावेळी सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले. 34 वर्षीय या खेळाडूसाठी यंदाची स्पर्धा अखेरचा वर्ल्ड कप ठरू शकतो.

मॅनुअर नेऊल (जर्मनी) ः जर्मनीची अभेद्य भिंत असलेला मॅनुअर नेउल आता 36 वर्षांचा झालाय. हा त्याचा चौथा वर्ल्ड कप आहे. 2014 मध्ये जर्मनीला जगज्जेता बनविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. कारण त्या स्पर्धेतील मॅनुअर हा सर्वोत्तम गोलरक्षक ठरला होता.

गारेथ बेल (वेल्स) ः हा संघ तब्बल 84 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच 1958 नंतर यंदा प्रथमच फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. 33 वर्षीय गारेथ बेलने वेल्सला या स्पर्धेचे तिकीट मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलीय. या अनुभवी खेळाडूवरच वेल्सची मदार असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *