Pune News : पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांना PMPML चा दणका, फ्री प्रवास बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । पुणे व पिंपरी चिंचवडमधील पोलिसांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) झटका दिला आहे.  (15 नोव्हेंबर) पासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येणार नाही. पीएमपीने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यात वाहतूक कोंडीवरून लेटर वॉर झालं होतं त्यानंतर पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त यांच्या लेटर वॉरमध्ये पीएमपीने पत्र काढून बीआरटी काढू नये असं सांगितले होते. मात्र आता पीएमपीएमएलकडून पोलिसांना मिळणारा मोफत प्रवास बंद करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमधून 1991 पासून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. (Latest Marathi News)

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीएमएल बसने नवा रेकॉर्ड केला आहे. काल पीएमपीएमएल बसने एकाच दिवसात दोन कोटी रुपये कमावले आहेत. पीएमपीएमएल बसमधून एकाच दिवसात १३ लाख पुणेकरांनी प्रवास केला.

पीएमपीएमएलच्या १६५७ बसेस रस्त्यांवर धावल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी प्रदूषण होत असल्याने पुणेकरांचा कल पीएमपीएमएल बसकडे वाढताना दिसत आहे. शहरात एसी बस, सीएनजी आणि मिनी बसेस रस्त्यांवर धावत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मजूर, कामगार, महिला, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचीही पीएमपी बस प्रवासात लक्षणीय वाढ झाली आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *