राहुल गांधींना मिठी मारणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं आधी शुद्धीकरण करा- केसरकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यात महाविकास आघाडीचे नेते सहभागी होत आहे. आदित्य ठाकरेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. तिथे त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गळाभेट घेतली यावर शिंदेगटाकडून शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या, राहुल गांधींना मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आधी अंघोळ घाला. त्यांचं शुद्धीकरण करा, असं शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणालेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. दसरा मेळाव्यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर आता शिंदे-ठाकरे संघर्ष टाळण्यासाठी शिंदेगटाच्या वतीने एकदिवस आधी म्हणजे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरेगटाच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आलं. त्यावरून दीपक केसरकर यांनी ठाकरेगटाला प्रत्युत्तर दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *