Post Office Investment Scheme : पोस्टाची जबरदस्त स्कीम ; महिन्याला जमा करा २६७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळणार इतके लाख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात कमी पैसे गुंतवूनही तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. यात रिटर्नसोबतच तुम्हाला सुरक्षिततेची पूर्ण हमीही मिळेल. ग्रामीण डाक जीवन विमा नावाची अशीच एक योजना आहे जी ग्राम संतोष या नावाने ओळखली जाते. या योजनेत मासिक 267 रुपये जमा करावे लागतील, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 2.44 लाख रुपये मिळतील. यासोबतच सुरक्षिततेचीही हमी देण्यात आली आहे. या योजनेला ग्राम संतोष या नावानेही ओळखले जाते. ही अशी योजना आहे ज्यामध्ये मॅच्युरिटीवर विम्याच्या रकमेसह बोनस देखील देण्यात येतो. ही सरकारी योजना आहे, त्यामुळे जमा केलेली संपूर्ण रक्कम सुरक्षित असते.

ग्रामीण भागात राहणारे लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. ही पॉलिसी घेण्यासाठी तुमच्या रहिवासी प्रमाणपत्रावरील पत्ता ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. या पॉलिसीची मुदत 5 वर्षे ते 41 वर्षे आहे. तुमच्यासाठी पॉलिसीचा कालावधी काय असेल, ते पॉलिसी घेताना तुमच्या वयावर अवलंबून असेल. आता प्रीमियम पेमेंट टर्मबद्दल माहिती घेऊ. तुमची पॉलिसी जितक्या वर्षांसाठी आहे, तितक्या वर्षांसाठी ग्राम संतोष पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागेल.

कितीचा इन्शूरन्स प्लॅन
ग्राम संतोष पॉलिसीमध्ये 10,000 रुपये ते 10,00,000 रुपयांपर्यंतचा विमा प्लॅन घेता येतो. पॉलिसीचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो. आता मॅच्युरिटीचे फायदे उदाहरणासह समजून घेऊ. 30 वर्षांच्या रोहितने 1,00,000 रुपयांच्या विमा रकमेची ग्राम संतोष पॉलिसी घेतली आहे. रोहितला तो 60 वर्षांचा झाल्यावर 1,00,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळवायची आहे. अशा प्रकारे रोहितने 30 वर्षांच्या पॉलिसी टर्म प्लॅन घेतला आहे.

उदाहरणातून समजू
रोहितला 30 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. जर रोहितने मासिक प्रीमियम निवडला असेल, तर त्याला दरमहा २६७ रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे रोहित 30 वर्षात 94,020 रुपये प्रीमियम म्हणून भरेल. रोहितच्या पॉलिसीचा कालावधी 30 वर्षांचा झाल्यावर, त्याला विमा रक्कम म्हणून 1,00,000 रुपये आणि बोनस म्हणून 1,44,000 रुपये मिळतील. अशाप्रकारे रोहितला 30 वर्षांनंतर एकूण 2,44,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *