‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे भाजप आणि आरएसएसचं श्रद्धास्थान कधीच नव्हतं!’ ; खासदार संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ नोव्हेंबर । ‘वीर सावरकर हे भाजप आणि आरएसएसचं श्रद्धास्थान कधीच नव्हतं!’, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या वक्तव्यावर माध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी बोलताना राऊत यांनी हे विधान केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (BJP And RSS) राजकारणासाठी सावरकर यांचा विषय घेतला, अशी टीका देखील राऊतांनी केली.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान गुरुवारी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारण तापलंय. राहुल गांधींच्या वक्तव्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही अडचणीत आणलं आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, जे लोकं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रेमी स्वतःला म्हणवून घेत आहेत, ते बनाव करत असल्याची शंकाही देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना गेली 10 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करते आहेत. अशी मागणी सावरकर प्रेमींनी शिवसेनेसोबत का केली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *