Rahul Gandhi Threat Letter: “तुम्हाला बॉम्बने…” राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ नोव्हेंबर । ‘भारत जोडो’ यात्रेमुळे सध्या चर्चेत असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू असं धमकावण्यात आलं आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांच हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत असल्याचं वृत्त ‘एबीपी’ने दिलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून धमकीचं पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून २४ नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत.दरम्यान पोलिसांनी हा खोडसाळ प्रकार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पण तरीही पोलीस सर्व काळजी घेत असून तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *