महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राबाबत विधान केले होते. त्यावर आजच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राहुल गांधी यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचं पाहायला मिळालं.
मात्र विनायक सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी थेट पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते एबीप माझाशी बोलताना म्हणाले की, “एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केला होती, पंडित नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केला, १२ वर्षे नेहरू भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते”
“माझी भारत सरकारला विनंती आहे की नेहरू आणि एलविना पत्र व्यवहार ब्रिटीशांना मागावा आणि तो जनतेत जाहीर करावा, तेव्हा जनतेला कळेल ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फाळणी केली ते समजेल”, त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुलटं आहे. यावर अजून कोणाची प्रतिक्रिया समोर आली नाही. रणजीत सावरकर हे विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू आहेत. ते हिंदुत्त्ववादी विचारांचे समर्थक आहेत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही त्यांची भूमिका आहे.