महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । कतारमध्ये सुरु होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु झालंय. उद्यापासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी जगभरातील 32 संघ कतारमध्ये दाखल झालेत.. युरोप, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेसह आशिया आणि आफ्रिकेतील फुटबॉल चाहते कतारमध्ये पोहोचलेत… मात्र या फुटबॉल विश्वचषकासाठी कतारमध्ये प्रशासनाने कडक नियम लागू केलेत… बिकीनी, बियर आणि सेक्ससंदर्भात कतारमध्ये कडक नियमावली लागू करण्यात आलीय.. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित फॅन्सची तुरुंगात रवानगी होऊ शकते. तसंच ड्रग्ज तस्करी केल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते… कतारमधील या नियमांमुळे फुटबॉल चाहत्यांचा हिरमोड झालाय..